रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार नारायण राणे यांना ४ लाख ५५ हजार २४ मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना ३ लाख ३ हजार ८३४ मते मिळाली आहेत. नारायण राणे यांचा ६१ हजार ६८१ मतांनी पराभव झाला आहे.
शिवसेनेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अस्तित्वाची लढाई होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार विनायक राऊत मैदानात होते. तर भाजप एकनाथ शिंदे गटाकडून हा मतदारसंघ हिसकवण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे उशीराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. कधीकाळी महाराष्ट्र शिवसेनेकडून मुख्यमंत्री असलेले राणे विरुद्ध ठाकरे गटाचे राऊत यांनी ही निवडणूक गाजवली. सिंधुदुर्ग हा राणेंचा गड आहे तर रत्नागिरी विनायक राऊतांचा गड आहे. त्यामुळे राणे रत्नागिरी ठाण मांडून बसले होते.