22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरसुरज मांदळे यांचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन पुरस्काराने सन्मान

सुरज मांदळे यांचा दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन पुरस्काराने सन्मान

लातूर : प्रतिनिधी
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतला अतिशय मानाचा पुरस्कार म्हणून मानला जातो. चित्रपट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणा-या व्यक्त्तींचा सन्मान या पुरस्काराने केला जातो. यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. त्यात लातूरचे सुपूत्र सुरज मांदळे यांना  इंडियन टेलिव्हीजन पुरस्काराने सन्मानीत केले.
दादासाहेब फाळके पुरस्कार आता चित्रपट क्षेत्रासोबतच समाज जीवनात कार्यकर्तृत्वातून सकारात्मक मूलगामी बदल घडवून आणणा-या व्यक्त्तींनाही देण्यात येतो, त्यापैकी मोटिवेशनल स्पीकर ऑफ द इयर २०२४ या कॅटेगरीत लातूर येथील सुरज सुर्यकांत मांदळे यांचा मोटिवेशनल स्पीकर दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड २०२४ देऊन गौरव करण्यात आला. लातूर तालुक्यातील मौ. भिसे-वाघोली सारख्या खेडेगावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या युवकास हा पुरस्कार मिळाल्याने लातूरच्या शिरोपेचात एक सन्मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सुरज मांदळे यांनी आपल्या मोटिवेशनला स्पीचमधून अनेक बेरोजगार असा  तरुणांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकवून जीवन जगण्याच्या  व्यवहारिक शर्यतीत खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रेरणा देत आहेत. त्यांच्या या आजोड आणि अथक कार्यामुळे समाजातील अनेक बेरोजगार आणि असा  तरुणांना जगण्याचा मार्ग सापडला व त्यातून समाजातील अनेक बेरोजगार आणि अस  हजारो तरुण, तरुणीं आयुष्यात खंबीरपणे उभे राहिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR