सोलापूर : स्वतः डॉक्टर असताना सुद्धा आपल्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिचा गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या सोलापूरच्या पूर्व भागातील नामवंत डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांच्यावर जेलरोड पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राधिका ऊर्फ रिध्दी श्रीनिवास पिंडीपोल, वय-२९ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ श्रीनिवास पिंडीपोल, राहणार साईबाबा चौक सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सप्टेंबर २०२३ ते आजतागायत यातील आरोपी डॉ श्रीनिवास पिंडीपोल यांने फिर्यादीशी लग्न करून तिचा जाणीवपूर्वक संभाळ करण्यास दुर्लक्ष केले. घरामध्ये प्रापंचीक सामान व किराणा माल न भरणे खर्चास पैसे न देणे व गरोदर पणात वारंवार होणारे तपासण्यासाठी पैसे न देणे तसेच फिर्यादीस व तिचे मुलास आईवडीलांना खल्लास करण्याची धमकी व शिवीगाळ करून शारीरीक व मानसिक त्रास देवून गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करीत आहेत