लातूर : योगीराज पिसाळ
१५ जून गेला, १५ ऑगस्ट गेला, १७ सप्टेंबर गेला तरी जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या १ लाख ५ हजार १४१ विद्यार्थ्यांंना दोन मोफत गणवेशापैकी अद्याप कोणताच गणवेश मिळाला नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनचा सारा बटयाबोळ दिसून येत आहे. गेल्यावर्षी रेडीमेड स्काऊट आणि गाईडचे गणवेश घेणा-या शालेय शिक्षण समितीला यावर्षी शिक्षण विभागाने ना हारकत प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर ई-टेंडर काढून विद्यार्थ्यांना स्काऊट आणि गाईडचा गणवेश पुरविण्याचा घाट घातला आहे. त्याच्या जोरदार हालचाली जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहेत.
नविन शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश धोरण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. लातूर जिल्हयात शाळा भरून चार महिने लोटले. दिपावली सणाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. शासनाने लातूर जिल्हा परिषदेच्या १ हजार २७५ शाळेतील, मनपाच्या १६ शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी सरसगट च्या १ लाख ५ हजार १४१ विद्यार्थ्यांंना एक शाळेचा व दुसरा स्काऊट गाईडचा गणवेश मोफत देण्याचे राज्य स्तरावरून धोरण ठरले. शाळेच्या गणवेशाचे फाडीव कापड १५ ऑगस्टच्या चार दिवस आगोदर आले. सदर कापड महिला आर्थिक विकास महामंडळाच्याकडून महिला बचत गटाकडे शिवण्यासाठी देण्यात आले होते. सदर गणवेशही अद्याप पूर्ण झाले नाहीत.
तसेच जिल्हयातील इयत्ता १ ली ते ८ वी विद्यार्थ्यांना सरसगट स्काऊट आणि गाईडचा गणवेश शिवून देण्यासाठी तालुका स्तरावर कापड येऊन पडले आहे. गेल्यावर्षी शालेय शिक्षण समितीने दुकानातून रेडीमेड गणवेश खरेदी केले होते. मात्र यावर्षी राज्यस्तरावरून या धोरणात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना स्काऊट आणि गाईडचा गणवेश शिवून देण्यासाठी शालेय समितींच्याकडून आमच्याकडे कपडे शिवण्यासाठी यंत्रणा नाही. अशी ना हारकत लिहून घेतली जात आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर सर्व ना हरकत जमा केल्या जाणार आहेत. जिल्हयातील सर्व विद्याथरर्््यासाठी जिल्हा स्तरावर ई-टेंडर काढून गणवेश शिवून घेतले जाणार आहेत. यात बराच वेळ जाणार आहे. येणा-या १५ ते २० दिवसात विधान सभा आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिपावली झाल्यानंतर तरी गणवेश मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.