18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeक्रीडास्थानिक क्रिकेटपटूंनाही ‘बीसीसीआय’चे मानधन

स्थानिक क्रिकेटपटूंनाही ‘बीसीसीआय’चे मानधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशांतर्गत क्रिकेट खेळणा-या क्रिकेटपटूंना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खुशखबर दिली आहे. पुरेसे मानधन मिळत नसल्याने अनेकजण देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळतात. पण, आता यावर तोडगा किंबहुना या क्रिकेटला प्राधान्य म्हणून बीसीसीआयने नवीन योजना आखल्याचे दिसते.
जय शाह यांच्या घोषणेनुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामनावीर आणि मालिकावीरच्या माध्यमातून पैसे दिले जातील. याशिवाय ज्युनियर स्तरावरील स्पर्धांमध्येही क्रिकेटपटूंना सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित केले जाईल आणि त्यांना बक्षीस रक्कम दिली जाईल. याशिवाय वरिष्ठ खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेत खेळणा-यांना दिली जाईल, असे जय शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले.
खरे तर जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुस-यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR