राजकोट : वृत्तसंस्था
स्मृती मानधना ही नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. स्मृतीला पहिल्या सामन्यात अर्धशतक करता आलं नाही. स्मृतीने त्याची भरपाई दुस-या सामन्यात केली. स्मृतीने दुस-या सामन्यात ७३ धावांची खेळी केली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. स्मृतीने तिस-या आणि आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करत बॅटिंगसह मालिकेचा शानदार शेवट केला. स्मृतीने या शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
स्मृतीने आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे १० वे शतक ठरले. स्मृतीने यासह १० एकदिवसीय शतकं करणारी पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू ठरली. तसेच स्मृतीने ७० चेंडूत शतक करत नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा वेगवान शतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. स्मृतीने हरमनप्रीतच्या तुलनेत १७ चेंडूंआधी शतक पूर्ण केलं. स्मृती यासह टीम इंडियाकडून वेगवान शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली.
स्मृतीने प्रतिका रावल हीच्यासह २३३ धावांची सलामी भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान १३५ धावांची खेळी केली. स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. स्मृतीने या खेळीत १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. स्मृतीने चौकार आणि षटकारांच्या मदतीने १९ बॉलमध्ये ९० धावा केल्या.