30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरहत्तुरे नगर येथे कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात

हत्तुरे नगर येथे कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात

सोलापूर – शोतोकॉन मार्शल आर्ट कराटे किंक बॉक्सिग अकॅडमी सल्लग्नित कराटे फेड्रेशन ऑफ शोतोकॉन इंडीया या संस्थेमार्फत कलर बेल्ट परीक्षा कै.रखमाबाई हत्तूरे मंगलकार्यालय येथे घेण्यात आली. ही परीक्षा सोलापूर जिल्हा टेक्निकल डायरेक्टर सेन्साई राजेंद्र हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रमाणपत्र बक्षिस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहूणे म्हणून पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचें व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.सचिन गायकवाड, कुंभार, प्रा . डॉ. दत्ता हरवाळकर, सुरवसे उपस्थित होते.

या मान्यवरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्लॅक बेल्ट विद्यार्थी नवनाथ काबळे , युराज सुंटनुर, वैभव स्वामी, मयुर फुलारी, भागेश धुमगोडा, चंद्रकांत तवटे , धनलक्ष्मी बिराजदार, तेजश्री फुलारी या विद्यार्थ्यानी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. दत्तात्रय हरवांळकर यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR