18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रहनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस

हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस

हेच भाजपचे हिंदूत्व आहे का? ; उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यासोबतच दादर स्टेशन येथील ८० वर्षांचे हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाने दिली आहे, त्यावर नरेंद्र मोदींची भूमिका काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेव्हा विश्वगुरु नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा खोचक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है’ असा नारा दिला होता. त्यानंतर आता महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरते आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज्यसभा सदस्य संजय राऊत देखील उपस्थित होते.

नवी मुंबईत सिडकोने देखील मंदिर हटवण्याची नोटीस दिली आहे, हेही ठाकरेंनी यावेळी लक्षात आणून दिले. बांगलादेशातील हिंदूबद्दल आणि दादर रेल्वे स्थानकातील मंदिराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे, हे त्यांनी जाहीर करावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दादर पूर्व येथील दादर रेल्वे स्थानकालगत हनुमान मंदिर आहे. ८० वर्षांपासून हे मंदिर येथे आहे. दादर रेल्वे स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली आहे. दादर स्थानकातील हमाल आणि हिंदू कॉलनी परिसरातील लाखो भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. या मंदिराला काढून घेण्याची नोटीस मंदिर विश्वस्त समितीला बजावण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR