18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरहरभ-याची १२५ टक्के क्षेत्रावर  पेरणी

हरभ-याची १२५ टक्के क्षेत्रावर  पेरणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात परतीच्या पावसानंतर रबी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्यात आहेत. जिल्हयात आजपर्यंत ३ लाख ९९ हजार ९०४ हेक्टरवर म्हणजेच ११७.६४ टक्के रबीची पेरण्या झाल्या आहेत. जिल्हयात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीचा १८ टक्के पेरा अधिक झाला असून हरभ-याची सर्वाधिक १२४.८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना रब्बी हंगामाकडून चांगले उत्पादन मिळेल अशी आपेक्षा आहे.
लातूर जिल्हयात यावर्षी ८८०.२० मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्हयाच्या भूजल पातळीतही २.२५ वाढ झाली आहे. यावर्षी जिल्हयात परतीच्या पावसानंतर गेल्या दिड महिण्यापासून शेतकरी शेतीची मशागत करून रबीची पेरणी करत आहेत. रब्बीच्या पेरण्या जवळपास संपत आल्या आहेत. जिल्हयात २ लाख ८० हजार ४३९ हेक्टर रबीचा पेरणीचे क्षेत्र उपलब्ध असून आज पर्यंत ३ लाख २९ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे. यात ज्वारीचा २१ हजार २४६ हेक्टरवर, गहू ११ हजार १९४ हेक्टर, मका १ हजार २०५ हेक्टर, हरभरा २ लाख ७३ हजार ९२३ हेक्टर, करडई १० हजार ५७७ हेक्टर, सुर्यफूल ५२ हेक्टर, जवस ७८ हेक्टर, तीळ, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR