24.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरहायवे परिक्रमा आंदोलनाला पाठिंबा; निटूर कडकडीत बंद

हायवे परिक्रमा आंदोलनाला पाठिंबा; निटूर कडकडीत बंद

निलंगा : प्रतिनिधी
लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होऊन हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आलेल्या हायवे परीक्रमा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार रोजी निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला. जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या विषयाला काँग्रेस पक्षाने हात घातल्याने जनतेमधून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णात्वाकडे जाण्याच्या आगोदरच बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडून सतत अपघात होऊन मोठ्या प्रमाणात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. हायवेवरून प्रवास आणि अपघाताला निमंत्रण असेच समीकरण झाल्याने आगोदरचाच रस्ता बरा होता किमान जीव तरी जात नव्हते असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. संबधित गुत्तेदाराकडे पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम असतानाही त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले नव्हते. हायवेवर दररोज होत असलेले अपघात अन जनतेची ओरड पाहून काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाच्या वतीने हायवे परीक्रमा आंदोलन पुकारण्यात आले. जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आल्याने या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. त्या अनुषंगानेच दि. ६ जुलै शनिवार रोजी सकाळी नऊ ते आकरा वाजेपर्यंत निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मार्केट बंद ठेवून परीक्रमा आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आम्ही सर्व व्यापारी आंदोलनात सहभागी आहोत असे व्यापा-यांनी सांगितले. निटूर बाजार चौकात दोन तास रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले.
 यावेळी उपस्थित काँग्रेस नेते, व्यापारी व ग्रामस्थांनी तीवृ भावना व्यक्त करत अपघातात मृत्यू पावलेल्या व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या परीवाराच्या भावना मांडल्या.  याप्रसंगी आंदोलनात कॉग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके,  डॉ. अरविंद भातांब्रे,  सुधाकर पाटील, पंकज शेळके, अपराजित मरगणे, गिरीश पात्रे, दिलीप हुलसुरे, शकील पटेल, संजय बिराजदार, दिनकर निटुरे, अशोक हसबे, सुभाष बाबा पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, अमर निटुरे, नंदकुमार हसबे, प्रसाद बुडगे, विठ्ठल काटेवाड, राजकुमार सोनी, गौतम कांबळे, बळी मादळे, पाशा शेख, समीर पठाण दिलदार साकोळे, अमोल सूर्यवंशी, अक्षय पाटील यांच्यासह व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR