22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरहासेगाव पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

हासेगाव पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

औसा : प्रतिनिधी
हासेगाव (ता.औसा)  येथील श्री.वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२३ या परीक्षेचा निकाल घोषित झाला असून राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पारंपरिक पद्धतीने दिलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचा आमदार अभिमन्यू पवार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
      राजीव गांधी इन्स्टीट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हासेगाव महाविद्यालयातून अथर्व देशपांडे प्रथम, व्दितीय क्रमांक शेख जिशान  तर  तृतीय क्रमांक काळे श्रुतीने पटकावला आहे. याचबरोबर (कॉम्प्युटर) संगणक अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातून काळे श्रुती प्रथम,आरबाळे मानसी व्दितीय, धवन अक्षता हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातून अथर्व देशपांडे प्रथम, शेख जिशान व्दितीय, जवळगे वृष्टी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. (इलेक्ट्रिकल) विद्युत अभियांत्रिकी शाखा व्दितीय वर्षातून भोसले गणेश प्रथम, भांगे पौर्णिमा व्दितीय, नागुरे नागेश तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर  तृतीय वर्षातून कांबळे सुग्रीव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. (सिविल) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून निकम बळीराम याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
     या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवंिलग जेवळे ,प्राचार्य संतोष मेतगे, प्राचार्या योगिता बावगे, संचालक नंदकिशोर बावगे , संचालक आत्माराम मुलगे, प्रा.एस.एन.गायकवाड ,प्रा.डी.पी.पाटील,प्रा.एस.एम.पंचाक्षरी, प्रा.ताडके के. डी.,प्रा.कल्याणकर एस ए,प्रा.पठाण एस ए ,प्रा कोरे आर एस,प्रा सांगवे आर एस,प्रा शेख टी एस, पाटील ए आर,ग्रंथपाल सवाई मनदिप, माने एस.एस.आदींनी अभिनंदन केले
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR