31.1 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहुती बंडखोरांच्या अड्ड्यांवर हल्ला

हुती बंडखोरांच्या अड्ड्यांवर हल्ला

बेहुत : गेल्या वर्षभरापासून हमाससोबत युद्धात गुंतलेल्या इस्रायलने मागच्या काळात चौफेर संघर्षाला सुरुवात केली आहे. एकट्याने इराण, हिजबुल्लाह, हमास आणि येमेनमधील हुती बंडखोर अशी चार मोर्चांवर आघाडी उघडली असून, मागच्या काही दिवसांपासून तुफानी हल्ले करीत हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले. आता त्यांनी येमेनमधील हुती बंडखोरांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले आहे.

इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी रविवारी दुपारी येमेनमधील होदेइदाह शहरातील हुती बंडखोरांच्या अड्ड्यांना लक्ष्य करून जोरदार हल्ले चढविले. हवाई दलाच्या लढाऊविमानांनी येमेनमधील रास इस्सार आणि होदेइदाह शहरातील हुती बंडखोरांच्या तळांना लक्ष्य केले. यात तेल आयातीसाठी वापरण्यात येणारे वीज केंद्र आणि बंदरावर एअरस्ट्राईक करून जोरदार बॉम्बहल्ले केले. त्यामुळे हा परिसर उद्ध्वस्त झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR