31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रहोर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १७ वर

होर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १७ वर

बचावकार्य सुरूच, अजूनही ३० जण अडकल्याची भीती
मुंबई : प्रतिनिधी
घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. या ढिगा-याखाली २५ ते ३० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजून अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलपंपावर होर्डिंग पडले, तिथे लोखंडी सापळ््याचा ढिगारा असून तो उपसण्याचे काम सुरू आहे. बचावकार्याला आणखी २४ तास लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा १७ वर पोहोचला आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेला २ दिवस उलटून गेले आहेत. अजूनही एनडीआरएफ आणि महापालिका आपत्ती सेवा, अग्निशमन दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत ५० टक्के ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. ढिगा-याखालून २५ दुचाकी आणि १० चारचाकी वाहने बाहेर काढली आहेत. याठिकाणी एक जोडपे आणि एक वाहन चालक असे एकूण ३ जण अडकले असून त्यांना जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी असून जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेकांचे संसार उघड्यावर
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अ्नेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR