लातूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत लातूर, धाराशिव, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १० ऑगस्ट लातूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे या बैठकीच्या पूर्व तयारीचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, रविशंकर जाधव, अॅड. फारुक शेख, प्रा. प्रवीण कांबळे, इमरान सय्यद, प्रवीण सूर्यवंशी, सचिन बंडापल्ले, सपनाताई किसवे, व्यंकटेश पुरी, गिरीश पाटील, विजयकुमार साबदे, ख्वॉजाबानु अन्सारी, केशरताई महापुरे, कैलास कांबळे, अहेमदखान पठाण, अॅड. देविदास बोरुळे पाटील, सुपर्ण जगताप, आसिफ बागवान, धोंडीराम यादव, बाळासाहेब देशमुख, आयुब मणियार, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, दगडूअप्पा मिटकरी, गणेश देशमुख, सुभाष घोडके, पुनीत पाटील, अमित जाधव, प्रवीण घोटाळे, जालिंदर बर्डे, सुंदर पाटील कव्हेकर, धनंजय शेळके, लक्ष्मीनारायण नावंदर, डॉ. आनंद पवार, डॉ. बालाजी सोळुंके, गोरिबी बागवान, विकास वाघमारे, रत्नदीप अजनीकर, महेश काळे, शेख कलीम, सुलेखाताई कारेपूरकर, संजय ओव्हळ, विजय गायकवाड, ख्वॉजमीयॉ शेख, युनूस शेख, विजयकुमार धुमाळ, शितलताई मोरे, अॅड. अंगदराव गायकवाड, अकबर माडजे, पवनकुमार गायकवाड, सिराज शेख, रामकिसन मदने, रईस टाके, अॅड.सुनीत खंडागळे, राजू गवळी, पवन सोलंकर, मैनुद्दीन शेख, निजामुद्दीन शेख, महेश कोळे, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, अमोल गायकवाड, किरण बनसोडे, युसूफ बाटलीवाला, गिरीश ब्याळे, शिवाजी कांबळे, हमीद बागवान, बाप्पा मार्डीकर, धनराज गायकवाड, शहाबाज खान, राजकुमार माने, अक्रम बोरीकर, रोहित वडरुले, शैलेश बोइनवाड, जय ढगे, करीम तांबोळी, इस्माईल शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, सर्व प्रभाग अध्यक्ष, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी काँग्रेस भवन येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या मराठवाड्यातील नूतन खासदारांचा सत्कार समारंभाचे आयोजन लातुरात काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या दिवशी करण्यात आले आहे. लोकसभेला सर्वांच्या सहकार्याने यश मिळाले खासदार डॉ. शिवाजी काळगे निवडून आले. यात लातूर शहराने सर्वाधिक मताधिक्य दिले. आता सर्वांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. महाराष्ट्रात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल यात मराठवाड्याचा वाटा सर्वाधिक असला पाहिजे.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातूर येथे १० ऑगस्ट रोजी लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मोठी सभा होईल. लातूरची संस्कृती बंंधुभावाचा कोणालाही विसर पडता कामा नये. आपण सर्वजण काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊ या असेही त्यांनी सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उद्देशून अपमानकारक वक्त्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व भारतीय जनता पार्टी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. या ठरावाला माजी महापौर दीपक सूळ यांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन शरद देशमुख यांनी केले तर शेवटी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी मानले.
सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्ध आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारुन त्यांचा अपमान केला आहे. जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी काँग्रेस भवन येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जात विचारणा-या भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला.