निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरुन बेकायदेशीरपणे टेम्पोतून ११५ शेळ्या निर्दयपणे डांबून वाहतूक करताना औराद शहाजानी पोलिसांनी पकडून दहा लाखांचा टेम्पो व दहा लाखकिंमतीच्या शेळ्या चार आरोपीसह वीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेळ्यांची वैद्यकीय तपासणी करून पोलिस संरक्षणात सदर शेळ्या एका शेडमध्ये हस्तांतरित करण्याची न्यायालयाकडे विनंती करण्यात आली आहे . निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील व्यापारी पेठ असलेले शहर आहे. राज्य हद्दीचा फायदा घेणा-या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी चेक पोस्ट लावून येणा-या व जाणा-या वाहनांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी असेच ११५ शेळ्या टेम्पोमध्ये निर्दयपणे विना परवाना दुस-या राज्यात वाहतूक करीत आसताना आढळून आला. दोन आंध्रप्रदेश दोन कर्नाटक अशा चार आरोपींना २० लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन नोटीस देउन सोडण्यात आले तर सदर ११५ शेळ्यांंना सावरी येथील खाजगी शेडमध्ये पालन पोषण करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. या शेळ्याची काळजी पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील घेत आहेत. या कार्यवाहीत शेळ्या मेढ्यांसह टेम्पोसह एकूण २०,३५,००० माल जप्त करुन आरोपी निरंजन फकीर अहमद रा मारीपल्ले, आंध्रप्रदेश मोहम्मद गौस अब्दुल अजीज गुलबर्गा कर्नाटक मोहम्मद नजीर अहमद गुलबर्गा कर्नाटक शेख मस्तानवल्ली शेख बाशा गुंटुर आंध्रप्रदेश यांना ताब्यात घेऊन नोटीस देउन सोडण्यात आले . सदरील शेळ्या पोलिस पाटील यांच्या निगरानीखाली पालन पोषण करण्यात येत आहे.