24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeसोलापूर११ बुलेटची पैज; समर्थकाची माघार

११ बुलेटची पैज; समर्थकाची माघार

सोलापूर : राज्यातील लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. निकालाबाबत अनेक अंदाज वर्तवले जात असून आपलेच नेते विजयी होणार असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये अगदी लाखोंच्या पैजा लावल्या जात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तब्बल ११ बुलेटची पैज लागली होती. मात्र आता अंतिम टप्प्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकाने माघार घेतली आहे.

लोकसभेच्या रणधुमाळीत यंदा माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. माढा लोकभा मतदारसंघात यावेळी भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली.
अशातच माढा तालुक्यातील बावी येथील मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी होणार असा दावा करत ११ बुलेट गाड्यांची पैज जाहीर केली होती. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा हे पाटील यांचे चॅलेंज स्वीकारात पैजेचा विडा उचलण्यासाठी पुढे आले होते.

मात्र आता ११ बुलेट गाड्यांची पैज लावणारे मोहिते पाटील समर्थक निलेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे. तर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा मात्र आजही पैज लावण्यावर ठाम आहेत. कायद्याच्या धाकामुळे आपण पैजेतून माघार घेतल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे, तर पैजेचा विडा उचलणा-या फलटणच्या अनुप शहा यांनी मात्र होऊ दे गुन्हा मी पैज लावण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR