39.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeसोलापूर१४१ कोटी रुपये दुष्काळ निधी तात्काळ वितरित करा

१४१ कोटी रुपये दुष्काळ निधी तात्काळ वितरित करा

कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची मागणी

करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यातील दुष्काळ निधीची १४१ कोटी रक्कम मंजूर झाली असून ती तात्काळ वितरित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली

कृषिमंत्री मुंडे करमाळा दौऱ्यावर आले होते यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांची निवेदन दिले. करमाळा तालुक्यातील 2933 शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर कृषी साहित्य खरेदीचे डीबीटी अंतर्गत चे १३ कोटी रुपये अनुदान थकीत असून ते तात्काळ देण्यात यावे.

चालू वर्षीचा तुरीचा अग्रीम पिक विमा आठ कोटी रुपये व मका पिकाचा २६ लाख मंजूर झाला असून ही कोटी २६ लाखाची रक्कम विमा कंपन्यांना काल शेतकऱ्यांना देण्याचे आदेश द्यावेत.

शेलगाव वांगी येथे केळी संशोधन प्रकल्प मंजूर करावा.तालुका कृषी कार्यालयासाठी नवीन चार चाकी वाहन द्यावी.या मागण्यांची निवेदन दिले.निवेदनावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR