20 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeलातूर२३५ पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचे उत्स्फूर्त मतदान

२३५ पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचे उत्स्फूर्त मतदान

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ अंतर्गत २३५- लातूर शहर विधानसभा मतदार संघात २३५ पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच १४१ होमगार्ड यांनी शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनीही मतदानाचा हक्क बजवला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ अंतर्गत बंदोबस्तावर असणा-या पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांच्यासाठी जिल्हातंर्गत मतदारांसाठी व जिल्हयाबाहेरील मतदरांसाठी दि. १५, १६, १७ व १८ नोव्हेंबर रोजी पोर्टल द्वारे पोस्टल मतदानासाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आहे. त्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ अंतर्गत शुक्रवारी ३८९ पैकी २३५ पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर १४४ पैकी १४१ होमगार्ड यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
तसेच लोकसभेच्या प्रमाणे पोलिस अधिकक्षक सोमय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण सेवेत पहिल्यांदा मतदान केले असे अनेक कर्मचारी यांनी  प्रतिक्रिया व्यक्त केली. उर्वरीत अधिकारी व कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी आहे.   जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR