16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्र२५ सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा राहणार बंद

२५ सप्टेंबर रोजी राज्यातील शाळा राहणार बंद

शिक्षक संघटना आक्रमक

पुणे : प्रतिनिधी
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी यिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. याला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ही अंमलबजावणी सुरू झाल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि २९ हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

नवीन धोरणानुसार २० किंवा त्‍यापेक्षा कमी पट असलेल्‍या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून, त्‍यासोबत सेवानिवृत्‍त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शिक्षक संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

शाळा बंद पडण्‍याची भीती
दरम्यान, नवीन शासन धोरणानुसार २० किंवा त्‍यापेक्षा कमी पट असलेल्‍या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्‍यासोबत सेवानिवृत्‍त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्‍या बंद पडण्‍याची भीती शिक्षक संघटनांनी व्‍यक्‍त केली. महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक परिषद राज्‍याध्‍यक्ष राजेश सुर्वे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR