27.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्र२८ डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा

२८ डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा

बीड, परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी, राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय

बीड : प्रतिनिधी
मस्साजोग तालुक्यातील केज गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकी कराडांना अटक करण्याची मागणी होत आहे. हत्येला १५ दिवस उलटले असून अद्याप आरोपीला अटक न झाल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. २८ डिसेंबरला निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान,
संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची हाकालपट्टी करा. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे. पोलीस अधिका-यांना सहआरोपी करावे. उद्यापासून २८ डिसेंबरच्या मोर्चाची तयारी करण्यात येणार आहे. मराठा समाजच्यावतीने संतोष देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मस्साजोग गावाला आणि कुटुंबला पोलीस संरक्षण द्यावे. बीड जिल्ह्यात समतोल बिघडलाय . वाल्मिकी कराड याची ईडीच्या माध्यमातून चौकशी करून नार्को टेस्ट करण्यात यावी. जोपर्यंत धनंजय मुंडे यांची हकालपट्टी होत नाही अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाला निदर्शन करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा
बीड जिल्ह्याच नाव खराब होतंय मुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पद हे मुख्यमंत्री यांनी स्वत: घ्यावं. राज्याच्या मुख्यमंत्री यांना पुरेसा पुरावा दिला आहे. तरी मूळ आरोपी पकडला गेला नाहीय. छोट्या मोठ्या कारणावरून हत्या होते. पण ज्या कारणावरून हत्या करण्यात आलीय ते बीडमध्ये दहशत पसरवण्याचे काम करण्यात ये आहे. महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने प्रकरण घेतलं नाही. वाल्मिकी कराडवर गुन्हा दाखल करावा. मोर्चानंतर पुन्हा एक राज्यस्तरीय बैठक होईल मग आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे.

मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करा
बीड जिल्ह्यात समतोल बिघडला आहे. त्या ठिकाणी एकाच जातीचे ७०% पेक्षा जास्त अधिकारी आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हा या घटनेचे खरा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR