19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeराष्ट्रीय३ कोटी कॉम्प्युटर यंदा भंगारात जमा होणार!

३ कोटी कॉम्प्युटर यंदा भंगारात जमा होणार!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१४ ऑक्टोबर २०२५ रोजी विंडोज १० चा सपोर्ट संपविण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने जाहीर केला आहे. त्यामुळे जगभरातील तब्बल ३.२ कोटी संगणक कच-याच्या डब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संगणकांना विंडोज ११ किंवा अन्य योग्य ऑपरेटिंग सिस्टिम्सवर (शिफ्ट) स्थानांतरण करावे लागेल, अन्यथा ते निरुपयोगी ठरतील.

आयटी सुरक्षा तज्ज्ञ थॉर्स्टन उरबांस्की यांनी सांगितले की, २०२५ मध्ये मोठ्या सुरक्षा अपयशातून वाचायचे असेल, तर सर्व वापरकर्त्यांना विंडोज ११ किंवा अन्य पर्यायी ऑपरेटिंग सिस्टमवर स्थलांतरित व्हावे लागेल. ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रतीक्षा करणे वापरकर्त्यास सायबर हल्ला आणि डाटा चोरी याबाबत संवेदनशील बनवू शकते. सध्या जर्मनीत सुमारे ६५ टक्के (३२ दशलक्ष) संगणक विंडोज १० चा वापर करतात. केवळ ३३ टक्के (१६.५ दशलक्ष) संगणक विंडोज ११ वर आहेत. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना तसेच विविध कंपन्यांना तातडीने ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड करावी लागणार आहे.

मायक्रोसॉफ्टकडून विंडोज १० चा सपोर्ट संपणार याचा अर्थ या संगणक प्रणालीला मोफत सुरक्षा अपडेट मिळणार नाही. त्यामुळे या संगणक प्रणालीस सुरक्षा जोखीम, डाटा चोरी आणि मालवेअर हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांना याचा फटका बसेल. जाणकारांनी सांगितले की, विंडोज १० च्या वापरकर्त्यांसाठी विंडोज ११वर अपग्रेड होणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. अन्य ऑपरेटिंग सिस्टिमचा पर्यायही आहे. सुरक्षाविषयक चिंता वाटत असेल, तर लिनक्ससारख्या सुरक्षित पर्यायांचा विचारही केला जाऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR