लातूर : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील ४ हजार ४३१ शिक्षक हे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने बुधवारी सामूहिक रजेवर गेले होते. यात जिल्हा परिषद व मनपाचे सर्वाधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. तर खाजगी शाळेतील नाममात्र शिक्षक सामूहिक रजेवर गेल्याचे दिसून आले. या रजा कालावधीत शाळा उर्वरित शिक्षक, युवा प्रशिक्षणार्थी, स्वयंपाक मदतणीसांंनी सांभाळल्या.
शिक्षकांमंध्ये आँनलाईन कामबद्दल प्रचंड असंतोष आसुन शासनाने सर्व आँनलाईन व अशैक्षणिक काम बंद करावी, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मच-यांंना १९८२ ची पेन्शन आदेश निर्गमित करावेत. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. २०२४-२५ वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी, आदी मागण्यांसाठी ४ हजार ४३१ शिक्षक सामूहिक रजेवर गेले होते.
यात जिल्हा परिषदेचे ४ हजार २५६ शिक्षक रजेवर गेले. मनपाचे ४५ शिक्षक, तर खाजगी शाळेतील केवळ १३० शिक्षक शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी सामूहिक रजेवर गेले होते. जिल्हा परिषदेचे ९५ टक्के पेक्षा जास्त शिक्षक रजेवर गेल्याने उर्वरीत ६७३ शिक्षक व सहा महिण्यासाठी रूजू झालेले युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक, अंशकालीन निर्देशक, स्वयंपाकी मदतणीस यांनी, तर खाजगी शाळेतील ४ हजार ९७० शिक्षक शाळेवर हजर होते. तसेच लातूर महानगर पालिकेच्या केवळ २ शिक्षकांनीच शाळांचा बुधवारी कारभार पाहिला.