19.3 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादांसोबत नाईलाजाने गेलो

अजितदादांसोबत नाईलाजाने गेलो

 

आमदार शिंगणेंची कबुली, शरद पवारांसोबत जाणार?

वर्धा : प्रतिनिधी
मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आहेत, अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ते वर्धा येथे बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो, त्यामुळे मी आलो. आदरणीय पवारसाहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो, काही वेगळ््या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाही. मी जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन-अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असे काहीच नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. मी मागे केवळ नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले. मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पवारांचे नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे, असेही शिंगणे म्हणाले.

भविष्यात पवार साहेबांचे नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे. मी पवारांचे नेतृत्व मान्य करतो. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. माझ्या राजकीय जडणघडणी मध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे, असेही शिंगणे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR