23.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रअजित गुप्ते भारताचे राजदूत म्हणून जर्मनीत नियुक्त

अजित गुप्ते भारताचे राजदूत म्हणून जर्मनीत नियुक्त

मुंबई: प्रतिनिधी
अजित विनायक गुप्ते यांची भारताचे राजदूत म्हणून जर्मनी येथे नियुक्त झाले आहेत. गुप्ते यांचा जन्म नागपूर येथे झाला. शालेय ,प्राथमिक,माध्यमिक शिक्षण नागपूर, अहमदनगर येथून झाल्यावर उच्च माध्यमिक मुंबई येथे सेंट झेवियर शाळेत झाले. चर्चगेट येथील जयहिंद कॉलेज ११वी,१२ वी केल्यानंतर सिडनेहम कॉलेज मधून त्यांनी बी. कॉम पदवी प्राप्त केली.

दरम्यान, छात्र सेनेतर्फे दिल्ली येथे होणा-या कॅम्प मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.अखिल भारतीय एनसीसी कॅडेट्स स्पर्धांमधून दुसरा क्रमांक पटकावला त्यामुळे त्यांची भारत – कॅनडा युथ एक्सचेंजसाठी निवड झाली. त्यांना अनेक युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाल्या होत्या परंतु फॉरेन सर्व्हिस जॉईन करून देशसेवा करणे हे त्यांचे ध्येय ठेवून ते भारतात परतले

. गुप्ते यांनी आयएफएस टॉपर्स मध्ये नंबर मिळवला. हाँगकाँग ,बीजिंग, ढाका डेप्युटी डायरेक्टर ऑफ क्लचर ’ रिलेशन्स, डेप्युटी चीफ ऑफ मिशन,बर्लिन .अशी वाटचाल चालू होती. त्यांची डेन्मार्क येथे राजदूत म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर बर्लिन येथे भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली असून ते लवकरच ही धुरा सांभाळन्या करिता जर्मनीला रवाना होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR