26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर

अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर

पुणे : प्रतिनिधी
महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना एक- एक उमेदवार जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो, अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दिलीप मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

नुकताच खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण नगरीत अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते-पाटील यांच्या विधानसभेतील कामाचे कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR