27.8 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार गटाचे मंत्री भरणे नाराज!

अजित पवार गटाचे मंत्री भरणे नाराज!

मंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच सहकुटुंब परदेशी रवाना
मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. त्यातच आता अजित पवारांचे मंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील नाराज असल्याचे समोर आले आहे. भरणे हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले आहे. परंतु मिळालेल्या खात्यावर ते नाराज असल्याने त्यांनी अद्याप खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही.

खातेवाटप होऊन आठवडा उलटला. पण भरणेंनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा जोर धरु लागली आहे. भरणे त्यांच्या कुटुंबासह परदेशात सुटीवर गेले आहेत. कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते परदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सुटीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते थेट मंगळवारी भारतात येतील, अशी माहिती त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून भरणेंची ओळख आहे. मात्र, त्यांना क्रीडा खाते देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे समजते. ते मंगळवारी भारतात येणार असून, त्यानंतरच त्यांची प्रतिक्रिया समोर येणार आहे. भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR