लातूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे कार्य मोठे आहे. त्यांचा नावलौकीक जगभर आहे. भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ द्यावा, अशी मागणी लातूर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजीत कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बोलतांना केले. ते म्हणाले, लातूर शहरातील अण्णा भाऊ साठे स्मारक हे लोकनेते विलासराव देशमुख आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे. मराठवाड्यात असे दुसरे स्मारक नाही, असे आर्वजून सांगीतले.
साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी लातूर शहरातील साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. प्रारंभी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर २०२४ चे अध्यक्ष राज क्षीरसागर, मोहन सुरवसे, गोरोबा लोखंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, गणेश एस.आर. देशमुख, जीवन सुरवसे, संभाजी मस्के, वर्षा मस्के केशरबाई महापुरे, मनीषा पुंड, सचिन कांबळे, विश्वजीत गव्हाणे, पिराजी साठे, आनंद वैरागे, पत्रकार अशोक देडे, नाना कांबळे, मंगेश वैरागे, सुनील बसपुरे, सुभाष घोडके, इम्रान सय्यद, रमेश सूर्यवंशी, अयोध्याबाई उपाध्याय, नारायण कांबळे, राजु मगर, अंगद गायकवाड, जी. ए. गायकवाड, सीताराम पवार, सच्चिंदर कांबळे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी पूढे बोलतांना म्हणाले की, लातूरच्या परंपरेनुसार आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करत आहोत. सार्वजनीक जीवनात आण्णा भाऊच्या विचारांचा वारसा आपण जोपसतो तो विचाराचा वारसा आपण सारेच पुढे घेऊन जात आहोत, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी सर्वांच्या परिश्रमातून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून व सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या योगदानातून उभे राहिले आहे. मराठवाड्यात असे स्मारक शोधूनही सापडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा नावलौकिक जगभर आहे भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असे सांगून त्यांनी सर्वांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.