17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द

अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले असतानाच निवडणुकीच्या मैदानात असलेल्या तीन उमेदवारांना आचारसंहितेची सीमा ओलांडल्यामुळे दणका बसला आहे. मध्य मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, उद्धवसेनेचे बाळासाहेब थोरात आणि पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाची परवानगी सहाय्यक निवडणूक अधिका-यांनी रद्द केली आहे.

मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत सदरील उमेदवारांचे प्रचार कार्यालय थाटल्यामुळे आचारसंहितेची सीमा ओलांडली गेली, त्यामुळे उमेदवारांना आता नियमांत कार्यालय सुरू ठेवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच, जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे देखील ऑनलाइन तक्रार केली होती. विधानसभा निवडणूक लढविणा-या उमेदवारांचे प्रचार कार्यालय २०० मीटर अंतराच्या आतील मतदान केंद्रानजीक आहे.

या तक्रार व याचिकेच्या अनुषंगाने मध्य मतदारसंघ आणि पूर्व मतदारसंघ निवडणूक अधिका-यांनी तपासले असता प्रचार कार्यालय मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतराच्या आत असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार प्रचार कार्यालयास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे.

प्रशासनाने दिलेली माहिती अशी
पूर्व मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले, उमदेवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयास दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांच्या कार्यालय प्रतिनिधीला कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR