24 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeलातूरअनधिकृत होर्डिंगचे दोन गुन्हे दाखल

अनधिकृत होर्डिंगचे दोन गुन्हे दाखल

लातूर : प्रतिनिधी
घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐवरणीवर आला. त्यामुळे निद्रावस्थेतील लातूर शहर महानरगपालिका कामाला लागली. दि. १७ मेपर्यंत महानगरपालिकेने १६ होर्डिंग निष्कासित केल्या असून  क्षेत्रीय कार्यालयामार्फत दोन गुन्हे नोंद करण्यात आले असल्याची माहिती मनपा उपायुक्त्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दिली. दरमन्या शहरात विविध ठिकाणी अवैध होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. हे होर्डिंग्स रविवार दि. १९ मेपर्यंत काढून घ्यावेत अन्यथा मनपाच्या वतीने ते काढण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
मुंबईत घाटकोपर येथील येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर मनपाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.त्यामुळे मनपाने या सूचना केल्या आहेत.ज्या खाजगी मालमत्तांवर मोठमोठे होर्डिंग लावलेले आहेत. ते होर्डिंग रविवार दि. १९ मेपर्यंत स्ट्रक्चरसहीत काढून घ्यावेत. सोमवारी असे होर्डिंग दिसून आले तर मालमत्ताधारक व एजन्सी धारकांवर क्षेत्रीय अधिका-यांकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
सार्वजनिक मालमत्तांवर लावण्यात आलेले होर्डिंगही तात्काळ काढून घेण्याचे निर्देश मनपाने दिले आहेत. ही होर्डिंग संबंधितांनी काढली नाहीत तर मनपाकडून ते काढले जातील. त्यासाठी होणारा खर्च संबंधित एजन्सीकडून वसूल करुन एजन्सी धारकावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. कांही जाहिरात एजन्सीनी  परवाना नूतनीकरणीसाठी मनपाकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यात त्रुटी असल्यामुळे असे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत.सद्यस्थितीत पालिकेकडे एकही प्रस्ताव प्रलंबित नाही.काही एजन्सीनी जाहिरात शुल्क भरल्याच्या पावत्या सादर केल्या आहेत परंतु त्या पावत्या जुन्या आहेत. संबंधितांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही .त्यामुळे त्या होर्डिंग विनापरवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात होर्डिंग उभा करावयाचे असतील तर त्यासाठी परवानगी घ्यावी, असे मनपाने सूचित केले आहे. ज्या व्यावसायिकांना होर्डिंगसाठी परवानगी आवश्यक आहे त्यांनी जागा मालकाचे मालकाचा बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, १०० रुपयाच्या बॉंडवर संमती पत्र, जागा मालकाने चालू वर्षाचा कर भरल्याची पावती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय/शासकीय तंत्रनिकेतनचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, होर्डिंगचे स्टील डिझाईन रिपोर्ट, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय अभियंत्यांचा अहवाल व बेबाकी प्रमाणपत्र सादर करुन पालिकेकडून रीतसर परवाना घ्यावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR