महाराजगंज : उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुमित्रा यादव या ३५ वर्षीय महिलेला रविवारी एकदा, दोनदा नव्हे तर आठव्यांदा साप चावला. दरवेळीप्रमाणे यावेळीही कुटुंबीयांनी महिलेला सामुदायिक आरोग्य केंद्र निचलौल येथे दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या विचित्र घटनेने आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. एकाच महिलेला वारंवार साप चावल्याची घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे.
सुमित्रा यादव सांगतात की, त्यांचे पती गोविंद यादव हे काम करण्यासाठी परदेशात राहतात आणि त्या आपल्या घरातील कामात व्यस्त असतात. रविवारीही त्या घरातील कामात मग्न असताना अचानक एक साप उजव्या हाताला चावला. या घटनेनंतर तिला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्र, निचलौल येथे आणण्यात आले, तेथे उपचार सुरू आहेत. पहिल्यांदा घडलेले नाही. याआधीही सात वेळा साप चावला होता.
महिलेने असेही सांगितले की २०२१ पासून सतत ही घटना तिच्यासोबत घडत आहे. यावेळी सर्पदंशाच्या घटनेनंतर इमर्जन्सी ड्यूटीवर तैनात असलेले आरोग्य कर्मचारीही आश्चर्यचकित झाले, कारण एकाच महिलेला पुन्हा पुन्हा साप चावण्याची ही परिस्थिती अत्यंत दुर्मिळ आणि असामान्य आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता ती पूर्णपणे बरी होत आहे.
एकाच महिलेला साप पुन्हा पुन्हा कसा चावतो, याचं गावक-यांना आश्चर्य वाटते. काही लोक याला दुर्मिळ घटना मानत आहेत. एकाच व्यक्तीला वारंवार चावा घेणं खरोखरच असामान्य आहे. ही घटना महाराजगंज जिल्ह्यात आश्चर्याची तर ठरली आहेच, पण या घटनांमागे काही विशिष्ट कारण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.