23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयअमरनाथ यात्रेसाठी ऑफलाइन नोंदणी सुरू

अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाइन नोंदणी सुरू

वाराणसी : जम्मू-काश्मीरमध्ये २९ जूनपासून बाबा अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीनंतर आता ऑफलाइन नोंदणीही केली जात आहे. स्वत:ची नोंदणी करण्यासाठी शिवभक्तांना आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची आवश्यकता असेल.याशिवाय, सर्व वयोगटातील लोकांना आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे देखील बंधनकारक आहे. अमरनाथ यात्रेकरू या कागदपत्रांसह विहित शुल्क जमा करून स्वत:ची नोंदणी करू शकतात.

बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या वाराणसी येथून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी बाबा अमरनाथला भेट देतात. यावेळीही यात्रेला जाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी नोंदणी केली आहे. बम-बम भोलेच्या घोषणांनी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अमरनाथ यात्रेला दरवर्षी देशभरातून हजारो भाविक जातात. यावेळी ही यात्रा २९ जूनपासून सुरू होऊन १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यासाठी पहिली तुकडी २८ जून रोजी जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून काश्मीर खो-यासाठी रवाना होणार आहे. १५ एप्रिलपासून यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. आता ऑफलाइन नोंदणीही सुरू झाली आहे.

दरम्यान, आज अमरनाथ यात्रेची ट्रायल रन जम्मू बेस कॅम्पवर घेण्यात आली. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार, एडीजीपी जम्मू आनंद जैन आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत उधमपूरचे उपायुक्त सलोनी राय यांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. आम्ही सर्व यात्रेकरूंची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करू. आम्ही उधमपूरमध्ये ६ हजार यात्रेकरूंना राहता येईल अशी २६ निवास केंद्रे बनवली आहेत. तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी सेटलमेंट सेंटरवर नोडल अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR