20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत ५३८ स्थलांतरित अटकेत; शेकडो लोक हद्दपार

अमेरिकेत ५३८ स्थलांतरित अटकेत; शेकडो लोक हद्दपार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी अमेरिकेत ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करण्यात आली आणि शेकडो लोकांना हद्दपार करण्यात आले.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अमेरिकन अधिका-यांनी लष्करी विमानांचा वापर करून ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे आणि शेकडो लोकांना हद्दपार केले आहे. एका संशयित दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. ट्रेन डी अरागुआ टोळीचे चार सदस्य आणि अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी आढळलेल्या असंख्य बेकायदेशीर स्थलांतरितांचा समावेश आहे, असंही त्या म्हणाल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिल्यांदा, त्यांनी बायडेन प्रशासनाचे ७८ निर्णय रद्द केले. दुसरीकडे अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. याशिवाय, ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर पुन्हा भिंत बांधण्याची घोषणा केली.

अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही याबाबत घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षिण सीमेवर अतिरिक्त १,५०० सैन्य पाठवतील. तेथे आधीच सुमारे २,५०० अमेरिकन नॅशनल गार्ड आणि राखीव दल आहेत. कोणते सैनिक किंवा तुकड्या जातील हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR