26.1 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeमनोरंजनअल्लू अर्जुननं मानले चाहत्यांचे आभार, पीडितेविषयी पुन्हा मागितली माफी

अल्लू अर्जुननं मानले चाहत्यांचे आभार, पीडितेविषयी पुन्हा मागितली माफी

 पीडितेच्या पतीची तक्रार मागे घेण्याची तयारी

हैदराबाद :
चंचलगुडा चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. रात्रभर कारागृहात राहिल्यानंतर अल्लू अर्जुन सकाळी बाहेर आला. यावेळी त्यानं पीडितेच्या कुटुंबीयांची माफी मागितली.चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल अल्लू अर्जुन यानं त्यांचे आभार मानले. मात्र त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने अल्लू अर्जुन याच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. त्यामुळे रात्रभर कारागृहात राहावे लागलेल्या अल्लू अर्जुनसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चंचलगुडा चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन याला रात्रभर कारागृहात ठेवण्यात आले. आज सकाळी बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन याने माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी अल्लू अर्जुन याने चाहत्यांचे आभारही मानले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठिक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. त्यामुळे मी पोलिसांना शक्य तेवढे सहकार्य करीन. चंचलगुडा चेंगराचेंगरी ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांचे झालेले नुकसान भरुन न येणारे आहे. या प्रकरणी मी पुन्हा शोक व्यक्त करतो, असे अल्लू अर्जुन याने स्पष्ट केले. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांना हात जोडून अभिवादनही केले.

पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली तक्रार मागे
अल्लू अर्जुन याचा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रार दाखल केली होती. मात्र अल्लू अर्जुनने ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट करत पीडितेबद्दल शोक व्यक्त करत २५ लाख रुपयाची मदतही पीडितेच्या नातेवाईकांना करण्याचे जाहीर करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांकडून अभिनेता अल्लू अर्जुन याच्याविषयी तक्रार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल होते. पीडितेच्या पतीने अल्लू अर्जुन याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वकिलांचे कारागृह प्रशासनावर आरोप
अल्लू अर्जुनला न्यायालयाकडून १४ दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर तेलंगाणा उच्च न्यायालयाने त्याला ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. मात्र जामीन मिळाल्यानंतरही अल्लू अर्जुनला रात्रभर कारागृहातच राहावे लागले. आज सकाळीच अल्लू अर्जुनची कारागृहातून सुटका करण्यात आली. मात्र अभिनेत्याला रात्रभर कारागृहातच राहावे लागल्याने त्याच्या वकिलांनी कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

अल्लू अर्जुनची सुटका
वकील अशोक रेड्डी यांनी मोठा संताप व्यक्त केला. कारागृह प्रशासनाला उच्च न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळाली, पण तरीही त्यांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला सोडले नाही. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागेल. ही बेकायदेशीर नजरकैद आहे, यावर आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहोत. आता अल्लू अर्जुनची सुटका झाली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR