लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने दि. १८ ते दि. २९ मार्च दरम्यान लातूर जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभाग यांनी संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवून ३४ गुन्हे नोंद करण्यात आले. यात ३४ आरोपींना अटक करण्यात आली.
सदर गुन्हयामध्ये १९ वाहने दारु वाहतुक करीत असतांना पकडले, हातभट्टी दारु २६४ लि., देशी १२० लि., विदेशी दारु ९७ लि. असा २३ लाख ८८ हजार ६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशान्वये धाबा चालक हे अवैधमार्गाने दारु विक्री अथवा दारुसेवन करण्यास परवानगी देतात, त्याविरुध्द विशेष कलमान्वये कार्यवाही केली आहे.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, आर. एम. चाटे, आर. व्ही. कडवे, यु. व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, एन. टी. रोटे, एस. आर. राठोड, एस. के. वाघमारे, बी. आर. वाघमोडे, एन. डी. कचरे, व्हि. पी. राठोड, बी. एल. येळे, एस. डी. घुले, एस. पी. काळे, डी. डी. साळवी, बी. एच. आशमोड, एस. पी. मळगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, निलेश गुणाले, मंगेश खारकर, षडाक्षरी केंगारे, गजानन होळकर जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, सौरभ पाटवदकर, सोनाली गुडले, ज्योतीराम पवार, श्रीकांत साळुंके, संतोष केंद्रे, कपील गोसावी, शेन्नेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, गिरी, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषि चिंचोलीकर, शैलेश गड़डीमे, हणमंत माने, हसुले, वडवळे यांनी सहभाग नोंदविला.