28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरअहमदपुरात बनावट नोटांसह १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदपुरात बनावट नोटांसह १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर : प्रतिनिधी
  अहमदपूर शहरात दि. २४ मार्च रोजी संध्याकाळी ०७ : ५० वाजता  गुप्त माहीतीच्या आधारे शहरातील काळेगाव रोड वरील हिना लॉज जवळ दोघे जण बनावट नोटा चलनात चालवत असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ सापळा रचुन ५००, २०० ,१०० रूपेच्या १२ हजार ७०० रूपयेच्या बनावट नोटा सहीत ५००, २००,१००, ५०, २०, रूपयांच्या ख-या नोटा  तसेच अ‍ॅपल, नोकीया कंपनीचा जुना  मोबाईल रेनॉल्ट कंपनीची इटीयॉस पांढ-या कलरची गाडी क्र एम.एच २४ व्ही ४८४७ आदीसह १ लाख ९२ हजार ५०० रू मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पो. हे. तानाजी  आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिर्झा शोएब बेग मिर्झा अन्वर बेग, वय २९ वर्षे, मिर्झा याकुब बेग मिर्झा अन्वर बेग वय १५ वर्षे, दर्वेश नगर हिंगोली नाका नांदेड यांच्यावर दि . २५  मार्च रोजी अहमदपूर पोलीसात गुरन  नं-२१० / २०२५  कलम १७८, १७९,  १८० ,३ (५) भारतीय न्याय २०२३  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला  असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR