परभणी : जागतिक व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने वडोदरा (गुजरात) येथे पार पडलेल्या जागतिक युवा टेबल टेनिस मालिकेत परभणीच्या आद्या बाहेतीने भारताचे प्रतिनिधित्व करत ११ वर्षे मुलींच्या वयोगटात उपांत्य फेरी खेळताना अवनी दुवा या खेळाडू सोबत तिला निसटता पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
आद्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्याकडे प्रशिक्षण घेते. तसेच अनिल बंदेल, सचिन पुरी, असद आली, अजय कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले तर ऐश्वर्या पाटील फिजिओ म्हणून आद्या सोबत कार्य करते. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता ४थी मध्ये शिकते.
या यशा बद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, अॅड. अशीतोष पोतनीस, आशिष बोडस, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननाकसिंह बस्सी, सुयश नाटकर, रोहन औढेंकर, परभणी जिल्हाध्यक्ष समशेर वरपुडकर, जिल्हा सचिव गणेश माळवे, डॉ.माधव शेजुळ, संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर, पवन कदम, पियूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार या वरिष्ठ खेळाडू, पालक, सवंगडी यांनी अभिनंदन केले आहे.