18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रआंदोलक महिलेची तब्येत बिघडली

आंदोलक महिलेची तब्येत बिघडली

मस्साजोगचे वातावरण तापले

बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगमधील गावक-यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचे मेडिकल करण्यात आले.

त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात हजर केले गेले. त्यावेळी त्याला १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणाचा पोलिस तपास वेगाने सुरू असताना दुसरीकडे आज बीडमधील मस्साजोगमधील गावक-यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस उलटले आहेत. आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

आज सकाळीच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मस्साजोग शिवारात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात गावातील महिला, लहान मुलेही सहभागी झाली होती. यावेळी जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची प्रकृती खालावली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जलसमाधी आंदोलन करणा-या गावक-यांशी चर्चा केली. यावेळी गावक-यांनी आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी नवनीत कॉवत यांच्याकडे केली. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर गावकरी हे तलावातून बाहेर पडले.

दहा दिवसांत फरार आरोपींना अटक : पोलिसांचे आश्वासन
फरार आरोपींना लवकरात लवकर अटक होईल, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दहा दिवसांत या फरार आरोपींना अटक करण्याचे आश्वासन गावक-यांना दिले आहे. आमचा तसा प्रयत्न आहे. गावक-यांना पोलिस संरक्षण आणि कुटुंबियांना वैयक्तिक संरक्षण दिलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR