26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रआंदोलनाला आंदोलनाने प्रत्युत्तर हा भाजपचा मूर्खपणा

आंदोलनाला आंदोलनाने प्रत्युत्तर हा भाजपचा मूर्खपणा

मुंबई : प्रतिनिधी
शिवद्रोही सरकारविरोधात आम्ही ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहोत. आंदोलनाला आंदोलनाने प्रत्युत्तर देणे हा भाजपचा मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. आम्ही फक्त ‘जोडे मारो’ करतो, शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, या सरकारमध्ये वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान होतो. राज्यपाल कोश्यारी यांनी अपमान केला, माफी मागितली नाही. मंत्र्यांनी अपमान केला, माफी मागितली नाही. सध्याचे केसरकर म्हणतात दु:ख कशाला करायचे वाईटातून चांगले घडते. ही विकृती आहे. भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली असेल तो त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील माफी मागितली असेल . पण महाराष्ट्राला संताप व्यक्त करायचा असेल तर तुम्ही थांबवू शकत नाही.

आज तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीत अशा आंदोलनाला परवानगी द्यावी लागते. तुम्ही देणार नसाल तर ही दडपशाही, झुंडशाही आहे. जिथे आंदोलन आहे त्या भागात सुटी आहे, तरी परवानगी देत नसाल तर हुकूमशाहीची धुंदी वाढली आहे

आम्ही फक्त जोडे मारो करतोय, शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता… आम्ही आंदोलन करतोय तर भाजपवाले आंदोलन करत आहेत. हा मूर्खपणा आहे. यांची डोकी फिरली आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही आंदोलन करतोय तर हे भाजपचे शतमूर्ख आमच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR