लातूर : प्रतिनिधी
जिल्हयातील ग्राम पंचायत कर्मचा-यांची वेतन श्रेणी, निवृती वेतन व इतर मागण्या व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतीचे सर्व कामे दि. १८ ते २० डिसेंबर या कालावधीत संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, विजपुरवठा कामगार, करवसुली कर्मचारी लिपीक इत्यादी अत्यल्प वेतनात काम करीत आहेत कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न ब-याच वर्षापासुन प्रलंबित आहे. ग्राम पंचायत कर्मचा-यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचा-यांप्रमाणे वेतनश्रेणी मजूर करावी, निवृत्ती वेतन लागु करावे, उपदान लागु करावे, ग्रामपंचायत कर्मचा-यांची भविष्यनिर्वाह निधिची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधि संघटन या कार्यालयात जमा करावी.
ग्राम पंचायत कर्मचा-यांना सुधारीत किमान वेतन लागु करणे बाबत व ग्रा. पं. कर्मचा-यांच्या वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रदद करावी, ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी, जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचा-यामधून एकुण रिक्त पदाच्या १० टक्के प्रमाणे वर्ग – ३ व वर्ग – ४ चे पदावर नियुक्ती करावी, ग्राम पंचायत कर्मचा-यांना सुधारीत किमान वेतन १० ऑगष्ट २०२० पासुन थकित असलेला वेतन अदा करावे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेत आठवडयातील ३ दिवस सफाई काम करण्याचे दिलेले आदेश तात्काळ रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सरचिटणीस दयानंद एरंडे, राज्याध्यक्ष विलास कूमरवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.