18.2 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रआता थंडीने राज्य गारठणार!; हवामान खात्याचा अंदाज

आता थंडीने राज्य गारठणार!; हवामान खात्याचा अंदाज

पुणे : प्रतिनिधी
पावसाने गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पाऊस आता परतीच्या वाटेवर आहे. यावर्षी थंडी देखील तशीच जोरदार वाजणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही वर्तविण्यात आल्याने ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, १५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस जाणार असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात सामान्यपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
राज्याच्या अनेक भागात ‘ऑक्टोबर हीट’चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अगदी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे.
वातावरणातील बदलाचे कारण काय?

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे. पाऊस देखील सरासरीपेक्षा जास्त कोसळला. प्रशांत महासागरात ‘ला-निना’ प्रणाली सक्रिय झाल्याचा परिणाम हवामानावर होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ‘ला-निना’ अ‍ॅक्टिव्ह होण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ‘ला-निना’ अधिक सक्रिय होण्याची शक्यता ७१ टक्के आहे. तसेच हवामान विभागाच्या मते, थंडी किती प्रमाणात पडेल याचा अंदाज नोव्हेंबर महिन्यात लावता येऊ शकतो. ‘ला-निना’ याच महिन्यात अ‍ॅक्टिव्ह होत असेल तर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडू शकते. ‘ला-निना’मुळे तापमानावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे थंडीतही पाऊस कोसळणार आहे.

‘ला-निना’चा प्रभाव किती?
‘ला-निना’ दरम्यान, पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात. त्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग थंड होतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ‘ला-निना’ सक्रिय होण्याची ७१ टक्के शक्यता आहे. कटऊ महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ‘ला-निना’ परिस्थिती उद्भवण्याची ७१ टक्के शक्यता आहे. जेव्हा ‘ला-निना’ येते, तेव्हा उत्तर भारतातील, विशेषत: उत्तर-पश्चिम भारत आणि आसपासच्या मध्य प्रदेशातील तापमान सामान्यपेक्षा कमी होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR