नंदुरबार : प्रतिनिधी
गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दोन सभा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या. राहुल गांधी यांची पहिली सभा नंदुरबार येथे पार पडली. राहुल गांधी म्हणाले, संविधानात तुम्ही कुठेही वाचाल तर तुम्हाला यात वनवासी नाही म्हटले तर आदिवासी म्हटले आहे. आदिवासी म्हणजे या देशाचे प्रथम मालक आहेत …पण भाजप, आरएसएस, पंतप्रधान तुम्हाला वनवासी म्हणतात.
गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दोन सभा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या. राहुल गांधी यांची पहिली सभा नंदुरबार येथे पार पडली. विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचार रंगत आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते सुद्धा महाराष्ट्रात येऊन प्रचार सभांना संबोधित करत आहेत.
वनवासी आणि आदिवासी यात खूप मोठा फरक आहे. आदिवासी म्हणजे या देशाचे प्रथम मालक होते. या संविधानात बिरसा मुंडा यांनी जो त्याग केला त्यांचे शब्द आहेत. त्यामुळेच संविधानात तुम्हाला आदिवासी नाव दिले आहे. आदिवासी म्हणजे हिंदुस्तानचे पहिले निवासी, हिंदुस्तानचे पहिले मालक… म्हणजेच हे जल, जमीन, जंगल यावर पहिला अधिकार आदिवासी नागरिकांचा आहे.
यासाठीच बिरसा मुंडा लढले. जमीन आमची, जंगल आमचे, जल आमचे.. पण याचा फायदा आम्हाला मिळत नाहीये. पण भाजप आणि आरएसएस तुम्हाल वनवासी म्हणत आहेत. तुमची दिशाभूल करत आहेत. वनवासीचा अर्थ तुम्ही जंगलात राहत आहात. वनवासीचा अर्थ तुम्हाला जल, जंगल आणि जमीन यावर अधिकार नाही. भाजप आणि आरएसएस तुमचे अधिकार हिसकावून घेत आहेत.
एक तारखेला खटाखट पैसे जमा होणार
राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार राज्यात येताच आम्ही सर्वात पहिलं काम महालक्ष्मी योजना लागू करणार आहोत. प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात एक तारखेला खटाखट खटाखट तीन हजार रुपये जमा होतील. तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील.
महिलांना एसटीने मोफत प्रवास
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस आघाडीचे सरकार येताच महिलांसाठी एसटी बसने मोफत प्रवास सेवा लागू होईल. जेव्हा तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल महाराष्ट्रता कुठेही फिरायचं असेल तर महिलांकडून एक रुपया न घेता त्यांना प्रवास करत येईल.
शेतक-यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ
राहुल गांधी म्हणाले, आता शेतक-यांना प्रश्न पडला असेल की, महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ३ हजार रुपये आणि मोफत बस सेवा देण्यात येणार मग आम्हाला काय? मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ३ लाख रुपयांपर्यंतचे तुमचे कर्ज आमचं सरकार माफ करेल.