सोलापूर – भावसार व्हिजन ने समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना हेरून त्यांची सेवा पुरस्कारासाठी निवड केली असून, आपल्या समाजाने केलेला हा सन्मान इतर कोणत्याही पुरस्कारा पेक्षा सर्वोत्तम पुरस्कार असतो असे प्रतिपादन खासदार कु.प्रणिती ताई शिंदे यांनी केले.त्या भावसार व्हिजन सेवा पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष सौ.प्रणिता महिंद्रकर,सचिव विशाल खामित्कर आणि माजी गव्हर्नर श्री.गिरीश पुकाळे उपस्थित होते.
यंदाच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री युद्धवीर महिंद्रकर, अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय जलतरणपटू घडविणारे मनीष भावसार आणि भावसार समाजातील पहिली महिला वैमानिक कु. मृदीनी राकेश कटारे यांची सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.भावसार व्हिजन चा अठरावा वर्धापन दिन आणि सोहळ्याची सुरुवात गायत्री महामांत्राने करण्यात आली.याच वेळी समाजातील दिवंगत व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष सौ.प्रणिता महिंद्रकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सेवा पुरस्कार देण्याचा उद्देश स्पष्ट केला. क्लबचे माजी गव्हर्नर गिरीश पुकाळे यांनी भावसार व्हिजन ने गेल्या अठरा वर्षात भावसार व्हिजन ने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी मनोज क्षीरसागर यांनी मनीष भावसार यांची, गिरीश पुकाले यांनी युद्धविर महिंद्रकर यांची तर शिवाजी उपरे यांनी मृदीनी कटारे हीची ओळख करून दिली. या तिघांना शाल,श्रीफळ, सन्मानपत्र आणि पुष्प गुच्छ देऊन खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी युद्धविर महिंद्रकर आणि कु. मृदीनी कटारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावसार व्हिजन चे आभार मानले.यावेळी भावसार व्हिजन चे सर्व संचालक,सदस्य आणि समाजातील विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोहळ्याचे सूत्र संचलन शिवाजी उपरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव विशाल खामितकर यांनी केले.