लातूर : प्रतिनिधी
लातुर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे जनसंपर्क अभियान सुरु केले असून दि. २३ मार्च रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराणा प्रतापनगर (म्हाडा कॉलनी) तर टवेन्टिवन अॅग्रीच्या संचालीका अदितीताई अमित देशमुख यांनी सिंकदरपूर येथे प्रचारार्थ पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला, या चारही ठिकाणी नागरीकांचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी पदयात्रेचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.
यावेळी महारणा प्रमापनगर येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगीता पतंगे, उपसरपंच राजकुमार पवार, महाराणा प्रतापनगरचे निरिक्षक तथा बाभळगाव उपसरपंच गोविंद देशमुख, विद्याताई पाटील, शिवाजी देशमुख, राम स्वामी, हमीद बागवान, यशपाल कांबळे, सुंदर पाटील कव्हेकर, सचिन बंडापल्ले, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, सहदेव मस्के, युनूस मोमीन, विजयकुमार पतंगे, नामदेव उपाडे, सज्जाद पठाण, आडे, लता कांबळे, सुलोचना उपाडे, मुजोद्दीन इनामदार, युसुफ शेख आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरीक उपस्थित होते. म्हाडा कॉलनी येथून पदयात्रेला सुरुवात झाली, त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर कुशिनारा बुद्ध विहार इथे जाऊन बुद्ध वंदना केली तसेच त्यांनी मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आलेल्या कलाकारांचे कौतुक करुन त्यांचा सत्कार केला.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, गेल्या अडीच वर्षातील महायुती सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार फोफावला आहे, जनता असुरक्षित आहे, महिलावर दलित अल्पसंख्यांक भटके विमुक्त यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. सामान्य माणसाची सध्या पिळवणूक होत आहे, महाराणा प्रतापनगर, बाभळगाव, म्हाडा कॉलनी येथे पूर्वी काही नव्हते. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या वसाहतीची निर्मिती केली या कॉलनीमध्ये बंगले इमारती उभ्या राहिल्या ही सुबत्ता काँग्रेसमुळे आली असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की लातूरात आज सर्वजण गुण्यागोंिवदाने उद्योग व्यवसाय व्यापार करतात २०१९ ते २०२४ या पाच वर्षात लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही २२५० कोटी रुपये चा निधी खेचून आणला महाराणा प्रतापनगर येथे ७० कोटी रुपये मंजूर केले पाणीपुरवठा योजना ही येथील ५४ कोटीची मंजूर केली सध्याच महायुती सरकार ४० टक्के कमिशन वाली सरकार आहे.
काँग्रेसचे इमान कधीही डगमगलेला नाही काँग्रेस पक्षने सर्व धर्म समभाव कायम जोपासला आम्ही एक हेल्पलाइन सुरु करत आहोत की जीवर फोन करायचा तुम्ही जिथे जिथे अडचणीत असाल तिथे येऊन तुम्हाला आमदार अमित देशमुख यांचा प्रतिनिधी मदत करेल बेकारी महागाई भ्रष्टाचार खुटलेले औद्योगीकरण यासारख्या गंभीर समस्या महायुती सरकारने निर्माण केले आहेत. लातूर जिल्हा रुग्णालय आम्ही मंजूर केले त्याची वीटसुद्धा या सरकारला रचता आली नाही आम्ही जिल्हाधिका-यांना सूचना केल्या आहेत या परिसरात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा लवकर स्थापन कराव्यात लातूर आतील अवैध धंदे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे लातूर आतील जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे असे त्यांनी
सांगितले.
ते म्हणाले की महायुतीचे नेते प्रचाराला आले की तुम्ही त्यांना जाब विचारा मागच्या अडीच वर्षात तुम्ही काय काम केले ते रेल्वेच्या कारखान्यात लातूरकरांना एकही नोकरी मिळाली नाही भाजप नेते उजनीतून पाणी आणू म्हणाले नाही पाणी आणले तर राजकारणातून संन्यास घेऊ म्हणाले त्यांनी आता राजकारणातून संन्यास घ्यावाच मी स्वत: अमित देशमुख आहे असे समजून काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा येत्या २० नोव्हेंबरला सर्वांनी हाताच्या पंजा समोरील बटन दाबून काँग्रेस महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले.