25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांना साथ देऊन विकासाचा रथ गतीमान करा 

आमदार धिरज देशमुख यांना साथ देऊन विकासाचा रथ गतीमान करा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेस पक्षाकडेच आहे. या मतदारसंघाचे आतापर्यंत जे जे आमदार झाले त्या सा-यांनी या मतदार संघाचा सर्वांगिण विकास केला. आमदार धिरज देशमुख यांच्या विकास कामांचा रथ संपूर्ण मतदारसंघात फिरत आहे. विकासाच्या या रथास अधिक गती देण्याकरीता मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांना पुन:श्च संधी द्यावी, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी व भंडारवाडी येथे दि. १७ संप्टेंबर रोजी तर दि. १८ संप्टेंबर रोजी रेणापूर तालूक्यातील हारवाडी, जवळगा, सेलू (खु) येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी डॉ. सौ. सारीका देशमुख, सुनिता अरळीकर, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेरअमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, चंद्रचुड चव्हाण, पुजाताई इगे, अनिताताई केंद्रे, धनराज देशमुख आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी विकास कामांची घडी बसवेली आहे. विकासाचा एक विचार दिलेला आहे. तोच विचार आणि वसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख प्रामाणिकपणे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करीत आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरीता देशमुख कुटूंबिय सदैव तत्पर आहे. या उलट भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक खोटी आश्वासने दिली आहेत. मतदारांची दिशाभूल करीत सत्ता मिळवणे, हाच एकमेव त्यांचा उद्देश ठरत आहे. येणा-या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपा आणि सत्ताधारी दिशाभूल करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तसेच यांच्या खोट्या, फसव्या आणि दिशाभूल करणा-या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन केले.
याप्रसंगी पाथरवाडी, भंडरवाडी येथील महिला सुमित्रा जाधव,भागिरती मदे, उषा सुडे, सुषमा खंदारे, अलका जाधव, सुलभा जाधव, सुमन मोरे, महानंदा सगर, जनाबाई येमले, सिमा जाधव, संगिता घुरमे, शाभो येमले आदी महिलांसह पुरूष मंडळी उपस्थित होती. तर हारवाडी, जवळगा, सेलू(बु) येथील द्रोपदीबाई हारवाडीकर, केरूबाई इंगळे, लक्ष्मीबाई कातपूरे, ससूबाई कांबळे, वर्षा इंगळे, वच्छलाबाई गाडेकर,शितल माने, लक्ष्मीबाई माने, शारदा माने, संगिताबाई माने आदी महिलांसह पुरूष मंडळी यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR