20.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घेतली भेट

आमदार धिरज देशमुख यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांची बंगळुरु येथे त्यांच्या निवासस्थानी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी भेट घेतली.  आगामी विधानसभा निवडणुकांची सध्या जोरात तयारी सुरु आहे. यातून वेळ काढत आमदार धिरज देशमुख यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बंगळुरु येथे भेट घेतली. यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. या भेटीत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांचीही उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदार धिरज देशमुख यांच्याकडून माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR