18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार संजय गायकवाडांची मतदारांना शिवीगाळ

आमदार संजय गायकवाडांची मतदारांना शिवीगाळ

बुलडाणा : प्रतिनिधी
आमदार संजय गायकवाड यांचा बुलडाण्यातील जयपूर येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी मतदारांनाच झापत मतदारांनाच फैलावर घेतले. तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजेत. तुम्ही लोक फक्त दोन दोन हजारांत विकले गेले असा आरोपही त्यांनी थेट मतदारांवर केला.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले त्याबाबत प्रथम नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांची गाडी सुसाट सुटली.

ते ऐवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी मतदारांना भाडखाऊ साले असेही म्हटले. तुमच्यापेक्षा शरीर विक्री करणा-या ब-या असे म्हणण्याची मजलही त्यांची गेली. त्यांनी थेट मतदारांनाच लक्ष्य केल्याने मतदारही यावेळी अवाक् झाले. त्यांना गायकवाड काय बोलत आहेत हेच समजत नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून घेण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. मात्र त्यांच्या बोलण्याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात होती. ते नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. मात्र त्यात ते विरोधकांवर टीका करतात.

यावेळी मात्र ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्याच मतदारांवर त्यांनी आगपाखड केली. मतदारांना शिवराळ भाषेत त्यांनी सुनावले. निसटत्या विजयाचा रागच जणू त्यांनी काढला आहे. जरी ते विजयी झाले असले तरी नाममात्र ८०० मतांनी जिंकणे हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. आपला पराभव व्हावा यासाठी पक्षातील नेत्यांनी षडयंत्र रचले होते असा आरोप त्यांनी याआधीही केला होता. त्यानंतर त्यांनी आता मतदारांनाही दोष दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR