बीड : बीडच्या शिरूर तालुक्यात संत खंडोबा बाबा मंदिर संस्थानच्या विकास कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची बरोबरी करू शकत नाहीत, असे धनंजय मुंडे म्हणाले. लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र भगवान बाबा यांना बाबा म्हटले जायचे तर गोपीनाथ मुंडे यांना साहेब म्हटले जायचे त्यामुळे मी आणि पंकजा , गोपीनाथ मुंडे साहेब व भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, अनेक व्यासपीठांवरून बोलताना लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र भगवान बाबा यांना बाबा म्हटले जायचे तर गोपीनाथ मुंडे यांना साहेब म्हटले जायचे त्यामुळे मी आणि पंकजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाहीत. आम्ही तुमची मुले आहोत आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारली तरी चालेल कारण आम्ही तुमची जबाबदारी घेतली आहे.
ऊसतोड मजुरांना शेतकरी बनवायचे
बीड जिल्ह्यात मोठ्या संघर्षाने वडवणी तालुक्याची निर्मिती झाली आहे. यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिरूर तालुका व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि शिरूर हा तालुका झाला. त्यांचे स्वप्न होते, शिरूर तालुक्याचा विकास व्हावा आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी या तालुक्याच्या विकासाचा कळस आता आपल्याला चढवायचा आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.