लातूर : प्रतिनिधी
येथील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ तथा गुगळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक गुगळे यांची महाराष्ट्र राज्य आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सर्वानुमते नियुक्ती केल्याची घोषणा केली.
डॉ. गुगळे यांच्या आयएमएमधील कार्याची तसेच अनुभवाची दखल घेत विशेष बाब म्हणून ही निवड करण्यात आली आहे. आयएमएमध्ये अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली आहे. हे महत्वाचे पद भुषविणारे लातूर जिल्ह्यातील ते पहिले डॉक्टर आहेत. आगामी काळात राज्यातील हॉस्पिटल विषयक समस्या समजावून घेण्यासाठी राज्यस्तरीय परिषद घेण्याचा मानस डॉ. दीपक गुगळे यांनी व्यक्त केला आहे.
राज्य आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कदम, मनोनीत अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, अनिल आव्हाड (मुंबई), डॉ. सौरभ सनजनवाला, डॉ. संजय कदम, डॉ. सुनील इंगळे, डॉ. अनिल पाटील, डॉ. यशवंत गाडे यांच्यासह खासदार. डॉ. शिवाजी काळगे, डॉ. अशोक कुकडे, डॉ. भराडिया, डॉ. बाहेती, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. उदय मोहीते, डॉ. जमादार, डॉ. चिंते, डॉ. जटाळ, डॉ. संतोष कवठाळे, डॉ. गिरीश मैदरकर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. संजय वारद, डॉ. उमेश कानडे, डॉ. अभय कदम, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. राजेश एनाडले यांनी अभिनंदन केले.