18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआर. आर. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचेय

आर. आर. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचेय

सांगली : प्रतिनिधी
मला आर. आर. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार हे वैभव दादा यांच्यासोबत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर हे चिन्ह उद्धव ठाकरे यांचे आहे. दिल्लीची वाकडी नजर महाराष्ट्रावर नेहमी आहे. आबांमुळे पोलिस भरती पारदर्शक झाली. नंतर एकही मोठी पोलिस भरती झाली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची प्रचार सभा होत आहे. सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली.

लोकसभेला बहीण लाडकी झाली आहे. पण या सरकारला नात्याची किंमत कळली नाही. नात्याला एवढी पंधराशे किंमत दिली. माझ्यावर टीका करतात. हो माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला.

माझा पांडुरंगावर विश्वास : सुप्रिया सुळे
माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. त्याच्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे. मी त्यांनाच विचारून भाषण काय करू विचारते आणि भाषण करते. स्वच्छतेविषयी बोलताना मी त्या देवाभाऊंसारखे कॉपी करणार नाही.काम करायचे असेल तर मन मोठे लागते. महागाई आणि बेरोजगारीला आम्ही कंटाळलो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR