15.3 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeराष्ट्रीयइस्रोच्या क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी

इस्रोच्या क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ब-याच काळापासून अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचे काम करीत आहे. अलीकडेच सरकारने यासाठी मिशन २०४० ची तयारी केली आहे. मिशन गगनयानच्या माध्यमातून भारत अवकाशात मानव पाठवणार आहे. हे काम करण्यासाठी इस्रो वेगवेगळ््या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. या प्रयत्नाला आता यश मिळाले आहे. इस्रोने सीई-२० क्रायोजेनिक इंजिनसाठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली. त्यामुळे अवकाशात मानव पाठविणे अधिक सोपे होणार आहे. यातून अवकाशात मानव पाठविण्याचा इस्रोचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रोने २९ नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली. या टेस्टमध्ये क्रायोजेनिक इंजिन रि-स्टार्ट करून पाहण्यात आले. ही टेस्ट गगनयान मिशनसाठी खूप आवश्यक आहे. मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. लॉंच व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) ला अपर स्टेजमध्ये पावर मिळते. मानवाला अवकाशात पाठवण्याची मोहीम यामुळेच यशस्वी होणार आहे.
गगनयान मिशन हे भारताचे पहिले ुमन स्पेस फ्लाईट आहे. २०२५ मध्ये हे लॉन्च केले जाणार आहे. या मिशन अंतर्गत ४ अंतराळवीरांना ४०० किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये पाठवले जाणार आहे. या अंतराळवीरांचे २०२० ते २०२१ या काळात ट्रेनिंग झाले आहे. दोन ते तीन दिवस हे अंतराळवीर तिथे संशोधन करतील. त्यानंतर हिंदी महासागरात त्यांना उतरवले जाईल.

मिशन गगनयान लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या यानात जाणा-या ४ अंतराळवीरांची नावेही निश्चित झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतराळवीरांची नावे जाहीर केली. केरळच्या तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४ अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी या चार अंतराळवीरांचा देशाला परिचय करून दिला. त्यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप,विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे.

गगनयान मिशनमध्ये
हे इंजिन वापरणार
सीई-२० क्रायोजेनिक इंजिनचा विकास स्वत: इस्रोने केला आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने हे इंजिन डेव्हलप केले आहे. हे इंजिन १९ टनांची थ्रस्ट लेवल ऑपरेट करू शकते. आतापर्यंत या इंजिनने सहा एलवीएम-मिशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. अलीकडेच या इंजिनला अपडेट करून २० टन कॅपेसिटीचे बनवण्यात आले आहे. गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरण्यात येईल. आता हे २२ टनापर्यंत वाढवण्यात आले आहे. क्रायोजेनिक इंजिनशिवाय मानवाला अवकाशात पाठवणे शक्य नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR